26 May 2016

मंडवारा कलान गावावर शोककळा

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील तरुणी मरण पावल्यानंतर तिच्या मंडवारा कलान या मूळ गावी शोककळा

बलिया, उत्तर प्रदेश, पीटीआय | December 29, 2012 5:15 AM

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील तरुणी मरण पावल्यानंतर तिच्या मंडवारा कलान या मूळ गावी शोककळा पसरली. गावचे प्रमुख शिवमंदिर सिंग यांनी सांगितले, की या तरुणीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आम्ही प्रार्थना केली. जी घटना घडली त्याबाबत लोकांच्या मनात संतापाची भावना व पश्चातापाची भावना असून हा गुन्हा केलेल्यांना कठोर शिक्षा करावी अशी त्यांची मागणी आहे.
गुन्हेगारांना यापुढे दहशत निर्माण होईल अशी शिक्षा दिली जावी असे सिंग यांनी म्हटले आहे. या तरुणीच्या एका नातेवाइकाने सांगितले, की आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यापासूनच या गावावर अस्वस्थतेची छाया होती.

First Published on December 29, 2012 5:15 am

Web Title: mandwara kalan village disturb