रेल्वे प्रवासादरम्यान आरक्षित जागेसाठी अधिकृत ओळखीचा पुरावा म्हणून आता m-Aadhar वापरता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आज यासाठी परवानगी दिली. आधार कार्ड मोबाईल अॅपच्या स्वरूपात वापरता येते यालाच m-Aadhar असे संबोधले जाते.


m-Aadhar या मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती आपले आधार कार्ड डाऊनलोड करु शकते. आधार क्रमांकाशी जो मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आला असेल त्याच मोबाईल क्रमांकावर हे अॅप वापरता येते.

रेल्वे प्रवासादरम्यान, ओळखपत्राची मागणी करण्यात आल्यानंतर प्रवाशाला आपल्या मोबाईलमधील हे अॅप ओपन करून त्यामध्ये पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर या अॅपमध्ये आधार कार्ड ओपन होईल. हे आधार कार्ड संबंधीत व्यक्तीला अधिकृत ओळखपत्राचा पुरावा म्हणून दाखवता येऊ शकणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

[jwplayer PGRFWD2l]