मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
विमान सुटण्याची तासन्तास प्रतीक्षा करताना एकाकीपणामुळे कंटाळलेल्या जिवांना आता डेटिंगचा आधार मिळणार आहे. अमेरिकेतील स्टीव्ह पॅस्टरनॅक या अवलियाने हा एकाकीपणा दूर करण्यासाठी एक विशेष वेबसाइट सुरू केली असून त्याद्वारे ज्यांच्याशी आपल्या आवडीनिवडी जुळू शकतात, अशा व्यक्तींसोबत विमानतळावर विरंगुळा साधता येणार आहे. मियामी विमानतळावर एकदा एक विमान कमालीचे विलंबाने सुटल्याने स्टीव्हला अनेक तास एकाकीपणे घालवावे लागले होते. या क्षणी आपल्यासोबत समविचारी मैत्रीण असती तर आपला वेळ आनंदात गेला असता, अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि त्याने या वेबसाइटचा घाट घातला. यातून या वेबसाइटचा जन्म झाला असून तिला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. अल्पावधीतच या वेबसाइटची सदस्यसंख्या २० हजारांवर पोहोचली आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















