पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये घुसून लष्करी कारवाई केल्याची शक्यता आहे असे वृत्त डॉनने प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या परवानगीने पाकिस्तानी सीमेपलीकडे अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी तळांवर ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती अर्थ मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी सिनेट (राज्यसभा) मध्ये दिली असल्याचे वृत्त डॉनने दिले. मागील गुरुवारी लाल शाहबाज कलंदर दर्ग्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये ८८ जण मृत्यूमुखी पडले होते. या हल्ल्याची योजना अफगणिस्तानमध्ये दहशतवादी तळावर झाली होती. अशी गुप्त माहिती पाकिस्तानच्या हाती लागली. त्यामुळे अफगाणिस्तानमधील काही दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत असे दार यांनी राज्यसभेत सांगितले. काही जणांचे म्हणणे आहे की हे दहशतवादी तळ अफगाणिस्तानमध्ये आहेत तर काही जणांचे म्हणणे आहे की पाकिस्तान-अफगणिस्तानच्या सीमेवर हे दहशतवादी तळ होते.

पाकिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये अफगणिस्तानच्या भूमीचा वापर करण्यात आला होता. ही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. दहशतवाद्यांना आटोक्यात आणण्यासाठी लष्कराधिकारी आणि नवाज शरीफ यांची बैठक झाली.  दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी काय वाट्टेल ते करा असे आदेश नवाज शरीफ यांनी या बैठकीदरम्यान दिले. त्यामुळे लष्कराने ही कारवाई केली.

Zakia Wardak resigns, Zakia Wardak,
अफगाणिस्तानच्या दूतावास अधिकारी झाकिया वारदक यांचा राजीनामा
Danesh Kumar Palyani
Video : “हिंदू मुली लुटीचा माल नाही”, पाकिस्तानच्या संसदेत हिंदू खासदाराने सुनावले खडे बोल
arrest
पाकिस्तानी जहाजावरील अमली पदार्थ जप्त; गुजरात किनारपट्टीवर कारवाई, १४ खलाशी अटकेत
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

मागील गुरुवारी लाल शाहबाज कलंदर दर्ग्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून बसलेल्या ७६ दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानने अफगाणिस्तानकडे सोपवली आहे. या दहशतवाद्यांचे तळ अफगाणिस्तानमध्ये आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे पाकिस्तानने अफगणिस्तानला सांगितले आहे अशी माहिती दार यांनी केली आहे.  ज्या वेळी दार ही माहिती सांगत होते त्या वेळी त्यांना ही कल्पना नव्हती की आपण केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यास दहशतवादी तयारी करत आहेत.  पेशावरमधील चरसड्डा जिल्ह्यातील न्यायालयाच्या आवारात तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर किमान ३० जण जखमी झाले. या हल्ल्याचेही धागेदोरे अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांशी जोडले जाण्याची शक्यता आहे.