30 May 2016

प्रख्यात गायिका एस. जानकी यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला

प्रख्यात गायिका एस. जानकी यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार देताना दक्षिण भारतातील राज्यांवर

नवी दिल्ली | January 26, 2013 1:30 AM

प्रख्यात गायिका एस. जानकी यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार देताना दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
गेली ५५ वर्षे आपण गाणी गात आहोत, त्यामुळे आपल्याला पद्मभूषण नव्हे तर भारतरत्न देऊन सन्मान करायला हवा, असंही एस. जानकी यांनी म्हटलं आहे.
ए.जानकी यांना दक्षिण भारतातील गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये जन्माला आलेल्या एस.जानकी यांनी वयाच्या १९ वर्षांपासून गाण्यातील कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी आजवर तामीळ, कन्नड, तेलगु मल्याळी या भाषांमध्ये वीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

First Published on January 26, 2013 1:30 am

Web Title: playback singer s janaki rejects padma bhushan