मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पंजाबमध्ये एका २४ वर्षीय युवतीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर दोन दिवस सामूहिक बलात्कार करुन त्यानंतर कारमधून फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (१८ जानेवारी) दोन अज्ञात व्यक्ती आणि दोन महिलांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कामानिमित्ताने चंदिगडला जाणा-या या युवतीचे अपहरण केले. तिला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले व अज्ञात स्थळी नेवून बलात्कार करण्यात आला. त्यानंतर रविवारी पीडीत युवतीला चालत्या कार मधून भटिंडा जवळील रस्त्यावर फेकून देण्यात आले.
पीडित युवतील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पीडित युवतीने पोलिसांना सांगितले की, "चंदीगडमधील सेक्टर ४३ येथे बसस्थानकावर मी उभी होते आणि पत्ता विचारण्याच्यासाठी त्यांनी कार माझ्याजवळ थांबविली. मी पत्ता सांगत असतांना त्यांनी मला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांनी मला कोठे नेले काही कळले नाही व माझ्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्या नराधमांनी त्याची चित्रफीतही बनविली".
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















