रोनाल्ड रेगन यांच्यानंतर तब्बल तीन दशकांनी  अध्यक्षपदाची दोनदा शपथ घेण्याचा विक्रम बराक ओबामा यांच्या नावावर नोंदविला जाणार आहे.  अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या ओबामांना मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी रविवारी शपथ दिली. त्यांना सोमवारी दुसऱ्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात शपथ देण्यात येणार आहे.   राज्यघटनेनुसार अध्यक्षांनी २० जानेवारी रोजी शपथ घेणे आवश्यक आहे.