गेल्या वर्षी भूकंपाच्या मोठय़ा तडाख्याने कोलमडलेल्या नेपाळला शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर ५.२ इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपाचे धक्के बिहारलाही जाणवले.

काठमांडूत भूकंपाचा जोरदार धक्का जाणवल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने सांगितले. यामुळे घाबरून लोक घराबाहेर पडले. या भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून १६ किलोमीटरवर होते. बिहारसह उत्तर भारतातील अनेक ठिकाणी हा भूकंप जाणवला.