पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्यांचे रशिया आणि चीनशी असणारे मतभेद बाजूला सारून वाढत्या इस्लामी कट्टरतावादाच्या धोक्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी बुधवारी केली आह़े  या वेळी त्यांनी मुस्लीम ब्रदरहूडच्या बंडखोरांशी लढणाऱ्या इजिप्तमधील लष्करी शासनाला साहाय्य करण्याचेही आवाहन केल़े
इस्लामी कट्टरतावाद आणि इस्लामच्या धोरणांचे राजकीयीकरण यांच्याशी सामना करणे हा जागतिक राजकीय कार्यक्रमपत्रिकेवरील प्रमुख कार्यक्रम असायला हवा़  जागतिकीकरणाच्या युगात शांततामय सहजीवनाची शक्यता क्षीण करणाऱ्या शक्तींना तोंड देण्यास बरेचसे पाश्चिमात्य विरोध करीत आहेत, असेही ब्लेअर म्हणाल़े इस्लामी कट्टरतावादाला लढा देण्यासाठी आपण  रशिया आणि चीनशीही सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.