गुजरात विधानसभा निवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला मोठ्या सुरक्षेत आज (गुरूवार) सकाळी सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात ८७ जागांसाठी मतदान होणार आहे. आज ज्या जागांसाठी मतदान होत आहे, त्यामध्ये सौराष्ट्रच्या सात जिल्ह्यामधील ४८, दक्षिण गुजरात मधील पाच जिल्ह्यांमधील ३५ आणि अहमदाबाद जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे.
राज्यात सत्तेवर असणा-या भाजपने सर्वच्या सर्व ८७ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
कांग्रेसने ८४ आणि गुजरात परिवर्तन पक्षाने (जीपीपी) ८३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी एकूण ८४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवलडणूक आयोगाने कायदा सुव्यवस्थेची मोठया प्रमाणात खबरदारी घेतली असून मतदान शांतपणे पार पडेल असा त्यांचा विश्वास आहे.
आज एकूण एक कोटी ८१ लाख ७७ हजार ९५३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे. यामध्ये ९५ लाख ७५ हजार २७८ पुरुष आणि ८६ लाख दोन हजार ५५७ महिला आणि ११८ इतर मतदारांचा समावेश आहे.