वयाच्या अवघ्या नवव्यावर्षी एका मुलीने दिला मुलीला जन्म

संबंधित मुलीने २७ जानेवारीला एका मुलीलाच जन्म दिला. नवजात मुलीचे वजन २.७ किलो इतके

मेक्सिको सिटी | February 6, 2013 03:28 am

मेक्सिकोमध्ये अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीने एका मुलीला जन्म दिल्याची घटना घडली. स्थानिक प्रशासन आणि संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत माहिती दिली.
आठ वर्षांची असताना संबंधित मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. एका १७ वर्षांच्या मुलामुळे ही मुलगी गर्भवती राहिल्याचे तपासात उघड झाले. हा मुलगा सध्या फरारी आहे, अशी माहिती मुलीच्या आईने दिली.
आम्ही त्या मुलाचा कसून शोध घेत आहोत. तो सापडल्याशिवाय या घटनेत नेमके काय घडले, हे समजणार नाही. हा बलात्काराचा प्रकार आहे की लहान मुलीवरील शारीरिक अत्याचाराचा, हे त्यानंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.
संबंधित मुलीने २७ जानेवारीला एका मुलीलाच जन्म दिला. नवजात मुलीचे वजन २.७ किलो इतके आहे. आई आणि मुलगी दोघींनाही रुग्णालयातून घरी सोडले आहे, ही माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱयांनी दिली.

First Published on February 6, 2013 3:28 am

Web Title: mexican girl gives birth at nine