अखेरच्या परीक्षेत ‘ती’ तरूणी आली पहिल्या तीन विद्यार्थीनींमध्ये

गेल्या महिन्यात दिल्लीत नराधमांच्या वासनेला बळी पडलेली तरुणी ही अत्यंत हुशार विद्यार्थीनी होती़

नवी दिल्ली | January 24, 2013 02:43 am

गेल्या महिन्यात दिल्लीत नराधमांच्या वासनेला बळी पडलेली तरुणी ही अत्यंत हुशार विद्यार्थीनी होती़  शेवटच्या परीक्षेत तिला ७३ टक्के गुण मिळाल्याचे ती भौतिकोपचार शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या संस्थेने जाहीर केले आह़े  वर्गमित्रांपेक्षा तिची टक्केवारी अधिक असल्याचे संस्थेने नमूद केले आह़े
२३ वर्षिय पीडित तरुणीने २००८ साली साई शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला होता़  चार वर्षांच्या अभ्यासक्रमात तिने दिलेल्या शेवटच्या परीक्षेत तिला ७३ तर वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सरासरी ५५  ते ६५ टक्क्यांदरम्यान गुण मिळले आहेत, असे संस्थेचे अधिष्ठाता हरीश अरोर यांनी सांगितल़े
गेल्या वर्षी गरवाल विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत तिला सहा विषयांमध्ये ११०० पैकी ८०० गुण मिळाले आहेत़  

First Published on January 24, 2013 2:43 am

Web Title: month after death delhi gangrape victim clears physiotherapy exam with 73 marks