दिल्ली गुरूद्वाराच्या आवारात संघर्ष

शीखांच्या मंदिराचे कामकाज कोण पाहणार यासाठी होणा-या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीखांच्या दोन गटांमध्ये आज

नवी दिल्ली | November 15, 2012 02:28 am

शीखांच्या मंदिराचे कामकाज कोण पाहणार यासाठी होणा-या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीखांच्या दोन गटांमध्ये आज संघर्ष उद्भवला. दिल्ली येथील राकबगंज गुरूद्वारा सेंट्रल येथे उद्भवलेल्या या संघर्षात दोन व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही बाजूंच्या गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि हल्ला करण्यासाठी तलवारीचाही वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

First Published on November 15, 2012 2:28 am

Web Title: violence within delhi gurudwaras premises