कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आदी विविध विषयांमधून संशोधन करू इच्छिणाऱ्यांकरिता मुंबई विद्यापीठाची ‘पीएच.डी. पूर्वपात्रता परीक्षा’ (पेट) १८ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३ एप्रिल ही शेवटची मुदत आहे. या परीक्षेसाठीचे पात्रता निकष, अभ्यासक्रम, मार्गदर्शकांची यादी, विषयनिहाय रिक्त जागा आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १८ एप्रिलला दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा होईल.