दौलत शेतकरी साखर कारखाना न्यूट्रियन्टस फ्रुट्रस प्रा. लि. गोकाक या कंपनीस ४५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. हा कारखाना विकण्यासाठी तब्बल दहा वेळा निविदा मागविल्यानंतर हा प्रश्न सुटल्याने बँक संचालक व प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील ‘दौलत’ हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला होता. त्यासाठी सात कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यापकी न्युट्रियन्टस् अ‍ॅग्रो फ्रुट्स, गोकाक या एकाच कंपनीने निविदेबरोबर बयाणा रक्कम भरली आहे. या कंपनीने ४५ व ६० वर्षांचे दोन प्रस्ताव दिले होते. त्यावर चर्चा होऊन जिल्हा बँक संचालकांनी ४५ वर्षांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामध्ये जिल्हा बँकेची सगळी थकबाकी २०२३पर्यंत कंपनी देणार आहे.
प्रस्तावात जिल्हा बँकेच्या ६७ कोटींच्या थकबाकीपोटी ५० टक्के रक्कम मार्च २०१७ पूर्वी भरण्याचे मान्य केले आहे. त्यातील २५ टक्के रक्कम कारखान्याचा ताबा घेण्यापूर्वी बँकेला मिळणार आहे.
उर्वरित ५० टक्के म्हणजे ३२ कोटी रक्कम, व्याजाचे ६ वार्षकि हप्ते निश्चित करून मुद्दल रकमेवर १२ टक्केप्रमाणे व्याज देणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची संपूर्ण थकबाकी २०२३ अखेर वसूल होणार आहे.
कारखान्याचा गाळप परवाना कायम राहण्यासाठी सप्टेंबपर्यंत चाचणी गळीत हंगाम घेणे बंधनकारक आहे. ‘न्यूट्रियन्टस’ कंपनीने याची तयारी केल्याने परवान्याची काही अडचण येणार नाही. ‘दौलत’ सुरू व्हावा, अशी शेतकऱ्यांसह कामगारांची इच्छा होती. आता हा तिढा सुटल्याने शेतकरी व कामगारांच्या देण्यांबाबत कंपनीशी चर्चा झालेली आहे. बँकसुद्धा संबंधित घटकाशी चर्चा करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

देणी भागवली जाणार
कामगार देण्यांबाबत युनियन किंवा वैयक्तिक कामगारांशी चर्चा करून तडजोड करण्यात येणार आहे. शासकीय देय रकमा संबंधित विभागाशी चर्चा करून यातून व्याजसूट, दंड व मुद्दल यात सवलत कंपनीमार्फत घेतल्यास त्याची रक्कम भाडय़ातून वजा करण्यात येणार आहे. कारखान्याचा ताळेबंद कंपनी लेखापरीक्षकाकडून निश्चित करून संबंधित सिक्युअर्ड देणी दिली जाणार आहेत. देणी भागवली जाणार असल्याने मोठा पेच सुटणार आहे.

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार