दत्त, जवाहर, शाहू साखर कारखान्याचा गौरव

नॅशनल फेडरेशन ऑफ को -ऑप. शुगर फॅक्टरिज ,नवी दिल्ली या संस्थेच्या राष्ट्रीय पुरस्कारावर कोल्हापुरातील तीन कारखान्यांची मुद्रा उमटली आहे. दत्त , जवाहर यांना प्रथम क्रमांकाचे, तर शाहू कारखान्यास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार नॅशनल फेडरेशनच्या वार्षकि साधारण सभेत देण्यात येणार आहे. तिन्ही कारखाने आपल्या कार्यक्षमतेद्वारा सातत्याने पुरस्काराचे मानकरी ठरत आले आहेत.
शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देशपातळीवरील उच्च साखर उतारा विभागातील ऊस विकासासाठीचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली. ते म्हणाले, नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज ही संस्था देशातील सहकारी साखर कारखान्यांच्या एकूण कामकाजाबद्दल आढावा घेऊन अग्रगण्य संस्थांना पुरस्कार प्रदान करते. श्री दत्तने हंगाम २०१५-१६ मध्ये राबविलेल्या ऊस विकास योजना, तसेच या योजनेमुळे ऊस क्षेत्रामध्ये झालेली वाढ, उत्पादन, तसेच उताऱ्यामध्ये झालेली वाढ विचारात घेऊन उच्च साखर उतारा विभागातील ऊस विकासासाठीचा प्रथम पुरस्कार संस्थेने जाहीर केला आहे. श्री दत्त शिरोळ कारखान्याला आतापर्यंत देशपातळीवरचे उल्लेखनीय ५२ पुरस्कार मिळाले असून पुरस्कारांची परंपरा कारखान्याने जपली आहे.
हुपरी (ता हातकणंगले ) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सन २०१५-१६ या हंगामासाठी देशपातळीवरील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दिली. जवाहरने मागील सन २०१५-१६ हंगामात १५१ दिवसात साखर उत्पादनात राज्यात प्रथम क्रमांक, तर ऊस गाळपात दुसरा क्रमांक मिळविला आहे. एकाच मििलग टेंडमवर उसाचे गाळप करणे हे जवाहर कारखान्याच्या गळीत हंगामाचे खास वैशिष्टय आहे .कारखान्यास यापूर्वी एकूण १८ पुरस्कारांनी गौरविलेले आहे. संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या मार्गदशर्नाखाली कारखान्याने सभासद शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र असल्याचे या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा अधोरेखित केले असल्याचे ते म्हणाले.
कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ट साखर निर्यातीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराने कारखान्यास आजपर्यंत मिळालेल्या पुरस्काराची संख्या ५६ वर पोहोचली आहे. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने ४ लाख ६२ हजार १२० िक्वटल साखर निर्यात कोणतीही व्यापारी कंपनी, संस्था यांची मध्यस्थी न घेता आपली यंत्रणा उभी करून थेट निर्यात केली आहे. द. आफ्रिकेतील सोमालिया, युगांडा, रवांडा, केनिया, संयुक्त अरब अमिरातीमधील सौदी अरेबिया, दुबई, कुवैत आणि श्रीलंका या देशांत ही साखर निर्यात केली. त्यामध्ये १ लाख ८३ हजार ६६० िक्वटल साखर कच्ची होती, तर दोन लाख ७८ हजार ४६० िक्वटल साखर पांढरी होती. विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारखान्याची वाटचाल सुरू आहे.