तिरुमला तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीसाठी नवरात्रात समारंभपूर्वक येणाऱ्या शालूचा शुक्रवारी लिलाव होऊन ५ लाख ५ हजार इतकी उच्चांकी बोली लावून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुभाष यमुल यांनी शालू स्वीकारला. गेल्या वर्षी शालूची मूळ किंमतच अधिक असल्याने लिलावधारकांना बोली लवताना मर्यादा आल्याने लिलाव तहकुब करण्यात आला. त्या शालूचाही लिलाव आज करण्यात आला. असता मनीषा खोराटे यांनी ७७ हजारांची बोली लावून स्वीकारला.

अंबाबाई मंदिरात बालाजी देवाकडून आलेल्या आज २०१५ च्या शालुपासून लिलावास सुरुवात झाली. शालूची मूळ किंमत ७५ हजार असून मनीषा खोराटे यांनी या शालूसाठी ७७ हजारांची बोली लावली.

यानंतर कुणीच बोली न लावल्याने तो खोराटे यांना मिळाला. यंदाच्या शालूची मूळ किंमत १ लाख रुपये ठरवण्यात आली होती.

इचलकरंजीच्या राम आडके यांनी १ लाख ११ हजारांची बोली लावली. पुण्याचे सुभाष यमुल, विजय फराकटे व  बेंगलोरचे बालाकृष्णन लिलावात सहभागी झाले.

चौघाही लिलावधारकांत मोठी चढाओढ सुरू होती. अखेर ही बोली ५ लाख ५हजारांवर येऊन थांबली. पुण्याचे सुभाष यमुल यंदाच्या मानाच्या शालूचे मानकरी झाले.

देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, धनाजी जाधव, सदस्य संगीता खाडे,  साळवी  यांच्या  हस्ते नारळ ओटी देऊन सुभाष यमुल यांच्या वतीने बोली लावणाऱ्या सिद्धेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.