उद्योगांचे रसायनयुक्त पाणी, मलायुक्त सांडपाण्यामुळे गटाराचे स्वरुप

इचलकरंजी येथील जीवनदायी असणारी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, तिला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोल्हापूर महापालिकेचे प्रक्रिया न करताच सोडले जाणारे मलायुक्त सांडपाणी, अस्ताव्यस्त टाकलेले निर्माल्य, कारखान्याचे रसायनयुक्त पाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे नदीपात्रातील पाणी आत्यंतिक दूषित झाले आहे. नदीच्या पाण्यात घातक रसायनांचे तवंग दिसत आहेत.

Uttans mango production hit by fire at solid waste plant
घनकचरा प्रकल्पाला लागणाऱ्या आगीचा उत्तनच्या आंबा उत्पादनाला फटका
Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याविषयी ओरड सुरू झाली की जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना जाग येते. थातूरमातूर उपाय केल्याची सोंगेढोंगे केली जातात. इचलकरंजी प्रशासनाकडूनही नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी विविध पातळींवर उपक्रम राबवले जातात, पण नागरिकांकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी निर्माल्य पंचगंगा नदीत अस्ताव्यस्त सोडल्यामुळे नदीच्या पाण्यातून दरुगध येत आहे.

नववर्ष उजाडले, की पाणीपातळी कमी होऊन नदीत ‘नेमेचि येतो पावसाळा’ या युक्तीप्रमाणे पावसाळा झाल्यानंतर पंचगंगा नदीचे पाणी दूषित होण्यास सुरुवात झालीच म्हणून समजावे. त्यामुळे एकीकडे कावीळ व डेंग्यूसारखे आजार पसरत असून, दुसरीकडे पंचगंगा नदीचे पाणी दूषित होत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सुजाण नागरिकांनी ही माहिती  नगरपालिका प्रशासनाला दिली असता प्रशासनाने पाहणी करण्याचे साधे कष्टही घेतले नाहीत.  समाजसेवेचा आव आणणारे नगरसेवकही याची जबाबदारी घेत नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. याकडे पालिका प्रशासन कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांतून होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी काविळीने ४० जणांचा बळी घेतला जाऊनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने आणखी किती जणांचा बळी जाणार? असा सवाल नागरिकांतून होत आहे.

फेब्रुवारीच्या महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात नदीपत्रात पाणी नसल्यामुळे इचलकरंजी शहरासह आजूबाजूच्या ४० खेडय़ांतील नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवत आहे. पंचगंगा नदीपात्रात सध्या इचलकरंजी शहराचे ड्रेनेजचे पाणी कोल्हापूर शहरासह कागल, शिरोली व  लक्ष्मी औद्योगिक वसाहत, इचलकरंजी शहरातील सायिझग व प्रोसेसचे रसायनयुक्त पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे नदीतील मासे मृत पडू लागले आहेत. तसेच नदीच्या पाण्यावर रसायनचा थर साचत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच उन्हाळा सुरू होत आहे. त्याच्या अगोदरच नदीची झालेल्या दुरवस्थेची खबरदारी शासकीय यंत्रणेने घेऊन नदी प्रवाहित ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे.