कळंबा कारागृहातील ओल्या पार्टीचा प्रकार ताजा असतानाच अकरा वष्रे शिक्षा भोगलेल्या एका कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचा आणखी एक प्रकार चव्हाटय़ावर आणला आहे. कारागृहात मोबाईल जवळ बाळगण्यास तीन हजार तर चाìजग करण्यास दीड हजार रुपये कैद्यांकडून घेतले जातात, अशी माहितीही पुढे आली आहे.
कळंबा कारागृहातील ओल्या पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच आता नव्या धक्कादायक गोष्टी बाहेर पडत आहे. कळंबा कारागृहातील ओल्या पार्टीची चित्रफीत प्रसिध्द झाली आणि कारागृहातील यंत्रेणेच्या कारभाराचा काळाबाजार जनतेपुढे आला. या प्रकरणी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कळंबा कारागृहात येऊन चौकशी केली. या संदर्भातील अहवालही कारागृह महानिरीक्षकांकडे सादर केला आहे. तसेच या प्रकरणी कारागृह अधीक्षकांसह, जेलरची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तीन कारागृह रक्षक निलंबित झाले आहेत, तर दोन तुरुंग अधिकारी चौकशीच्या रडारावर आहेत.
अकरा वष्रे शिक्षा भोगलेल्या एका कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचा आणखी एक प्रकार चव्हाटय़ावर आणला आहे. हा कैदी दोन महिन्यापूर्वी कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आला आहे. कारागृहात असणाऱ्या कैद्यांना कारागृहात थेट मोबाईल वापरण्यास मिळतात. यासाठी त्यांना अधिकाऱ्यांना महिन्याला काही रक्कम अदा करावी लागते. मोबाईल जवळ बाळगण्यास तीन हजार रुपये तर मोबाईल चाìजग करण्यास दीड हजार रुपये द्यावे लागत आहेत, अशी माहिती त्याने दिली. तसेच कारागृहात होणाऱ्या ओल्या पाटर्य़ाबाबतही त्याने दुजोरा दिला आहे.
संपूर्ण कारागृहाची चौकशी
बातम्यांची दखल घेत करागृह महानिरीक्षकांनी आता कारागृहातील संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते. यामुळे आता वरिष्ठ पातळीवरील अधिकार्याचे पथक या चौकशीसाठी हजेरी लावणार असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.