मुंबई महापौर चषक लंगडी स्पर्धेत अमरहिंद मंडळाने दुहेरी मुकुटावर नाव कोरले. पुरुष आणि महिला दोन्ही गटात अमरहिंदने श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या संघांना नमवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम लढतीत अमरहिंदने श्री समर्थ व्यायाम मंदिरावर २३-२१ असा निसटता विजय मिळवला. अमरहिंदच्या मधुरा पेडणेकरने १ मिनिट संरक्षण करताना ७ गडी बाद केले. संजना कुडवने १.१० मिनिट संरक्षण करताना ५ गडी बाद केले. पुरुषांच्या अंतिम लढतीत अमरहिंदने श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाचा ४०-२ असा एक डाव आणि ३८ गुणांनी धुव्वा उडवला. अमरहिंदच्या किरण कर्णवारने ३.४० मिनिटे संरक्षण करताना १० गडी बाद केले. ऋतिक शिवलकरने ३.१० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. सुनील बुरजेने ८, प्रसाद भाटकरने ५ तर तरुण मेस्त्रीने ४ गडी बाद केले. किरण कर्णवार व मधुरा पेडणेकर सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरले. ऋतिक शिवलकर व सिद्धी हरमळकर यांना सवरेत्कृष्ट संरक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. दीपेश गडेकर व संजना कुडव यांची सवरेत्कृष्ट पकडपटू म्हणून निवड झाली.