पाच वेळा जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळूनही विजय मिळवण्यात अपयश आले. लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्ससोबत त्याने बरोबरी स्वीकारली.
नुकत्याच झालेल्या ग्रँड बुद्धिबळ स्पध्रेत प्रारंभीच्या काही सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे आनंदने या स्पध्रेत बचावात्मक पवित्रा स्वीकारला. शनिवारी स्पध्रेतील पाच पैकी चार सामने अनिर्णीत राहिले. आता आनंद सहाव्या स्थानावर असून, तोपालोव्ह किंवा अरोनियन या स्पध्रेतील अव्वल खेळाडूंवर विजय मिळवल्या आघाडीच्या दोन स्थांनावर त्याला विराजमान होता येईल.