भारताच्या डेव्हिस संघात स्थान न मिळालेल्या रोहन बोपण्णाने कॉलिन फ्लेमिंगच्या साथीने एटीपी टेनिस स्पर्धेतील दुहेरीत आगेकूच कायम राखली. त्यांनी ज्युलियन नॉली व फिलिप पोलासेक यांच्यावर ७-५, ६-१ असा विजय मिळविला. बोपण्णा व त्याचा ब्रिटिश सहकारी फ्लेमिंग यांनी सामन्यात तीन वेळा ब्रेकपॉइन्ट्स वाचविले.