खेळाचे मैदान गाजवल्यानंतर क्रिकेटपटू आपल्या आत्मचरित्रातून जोरदार फलंदाजी केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. आजवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपल्या आत्मचरित्रातून क्रिकेट विश्वातील अनेक धक्कादायक खुलासे केले. क्रिकेटपटूंनी आत्मचरित्रात केलेल्या विधानांनी अनेकांच्या भुवया उंचावण्यास भाग पाडले. आता असेच एक लक्षवेधी विधान ऑस्ट्रेलियाचा नुकताच निवृत्ती स्विकारलेला वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने आपल्या आत्मचरित्रात केले आहे.

BLOG : २४ कॅरेटच्या पुढे ‘कोहली कॅरेट’!

बाऊन्सर गोलंदाजीने फलंदाजांना नामोहरम करणारा मिचेल जॉन्सन आणि ‘रनमशिन’ म्हणून ओळख असलेला भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली यांच्यात २०१४ साली अॅडलेडवर रंगलेली लढत अविस्मरणीय होती. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर सातत्याने बाऊन्सर्सचा मारा होत असतानाही विराट कोहली तग धरून उभा होता. त्यात मिचेल जॉन्सनने टाकलेला एक बाऊन्सर विराट कोहलीच्या हेल्मेटला जोरदार आदळला होता. जॉन्सनच्या बाऊन्सरने विराट बिथरला होता. पण कोहलीने त्यानंतर संघर्ष करून शतकी खेळी साकारली होती.

वाचा: विराटची गोष्ट, नव्हे रिपोर्ताज!

विराटला टाकलेल्या बाऊन्सरचा उल्लेख जॉन्सन याने आपल्या आत्मचरित्रात केला आहे. विराटला टाकलेला बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळल्यानंतर वाईट वाटले होते आणि चिंताग्रस्त झालो होतो, असे विधान मिचेल जॉन्सन याने आपल्या पुस्तकात केले आहे. यासोबत त्याने ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू फिज ह्युजेसचा बाऊन्सर चेंडू लागून झालेल्या मृत्यू हा आयुष्यातील सर्वात धक्कादायक प्रसंग असल्याचेही म्हटले आहे. फिल ह्युजेस प्रकरणानंतर माझ्यात खूप बदल झाले. बाऊन्सर चेंडू टाकताना मी खूप विचार करू लागलो होतो. अनेक दिवस तर मी बाऊन्सर चेंडू टाकणे सोडून दिले होते, असेही मिचेल याने आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.

वाचा: गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात सर्व आलबेल