ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचे आव्हान

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे खचलेल्या भारतीय संघाला आयसीसीच्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील अव्वल स्थान साद घालते आहे. २६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवल्यास भारताला अग्रस्थानावर विराजमान होता येईल.

भारताच्या खात्यावर सध्या ११० गुण जमा आहेत. जर भारताने ट्वेन्टी-२० मालिका ३-० अशी जिंकल्यास भारत १२० गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचेल. तर ऑस्ट्रेलियाचे ११० गुण होतील आणि ते आठव्या स्थानावर असतील. जर भारताने मालिका २-१ अशी जिंकली तर ऑस्ट्रेलिया सहाव्या आणि भारत सातव्या स्थानावर असतील. ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ अशी जरी जिंकली तरी ते अव्वल स्थान गाठू शकतील. सध्या ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत आठव्या स्थानावर आहेत.