भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असली तरी भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे गेल्या तीन सामन्यांत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. भारतीय संघाच्या मधल्या फळीची भिस्त असलेल्या रहाणेने गेल्या दोन सामन्यांत तर पुरती निराशा केली. तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळख असेलला रहाणे इंग्लिश गोलंदाजांच्या जाळ्यात अकडून स्वस्तात बाद झालेला पाहायला मिळाला. इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे मैदानात खेळवला जाणार आहे. अर्थात घरच्या मैदानात रहाणेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे. गेल्या तीन सामन्यांत झालेल्या चुका आणि फलंदाजीतील अपेक्षित बदल यांची माहिती करून घेण्यासाठी रहाणेने नुकतेच आपले प्रशिक्षक प्रविण अमरे यांची वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमसीएच्या मैदानात भेट घेतली. प्रविण अमरे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी रहाणे एमसीएच्या मैदानात दाखल झाला होता. यावेळी अमरे यांनी रहाणेला मार्गदर्शन देखील केले.

वाचा: …आणि प्रवीण अमरेंचा सल्ला अजिंक्यच्या कामी आला

Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

प्रविण अमरे हे अजिंक्यचे प्रशिक्षक राहिले आहेत. याशिवाय, अमरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षाखालील भारतीय संघाने २०१२ साली विश्वचषक देखील जिंकला होता. अमरे सध्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. रहाणेने इंग्लंडविरुद्धच्या गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ ६३ धावा केल्या आहेत. रहाणे इंग्लंडच्या मोईन अली, रशीद आणि अन्सारी या फिरकी जाळ्यात अडकताना दिसला. त्यामुळे अमरे यांनी यावेळी फिरकीला सामोरे जाण्याचा सराव रहाणेकडून करून घेतला. रहाणेला फलंदाजीचे टीप्स देताना अमरे दिसून आले. रहाणेने मैदानात खूप वेळ घाम गाळला. येत्या गुरूवारपासून वानखेडेवर चौथ्या कसोटीला सुरूवात होणार असून रहाणेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर दोन कसोटी सामने भारतीय संघाने जिंकून आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता इंग्लंडला ४-० अशी धूळ चारणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याने दोनही संघांकडून खूप धावा वसुल केल्या जातील, असे सांगण्यात येत आहे.