भारताच्या एच एस प्रणॉयने धक्कादायक निकालाची नोंद करत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पध्रेत आगेकूच केली़ प्रणॉयने ०-१ अशा पिछाडीवरून जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान असलेल्या डेन्मार्कच्या जॅन ओ जॉर्गेन्सेनचा  १८-२१, २१-१४, २१-१४ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  
महिला एकेरीत सायना नेहवालने सोप्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत गाठली. सायनाने भारताच्याच रुथविका शिवानीवर २१-१६, २१-१७ असा विजय मिळवला़    
पुरुष गटात जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या पारुपल्ली कश्यपला चीनच्या झ्युई साँगने पराभूत केले. ४१ मिनिटांच्या या सामन्यात साँगने २१-१७, २१-११ असा सोपा विजय साजरा केला़  इतर लढतीत किदम्बी श्रीकांतने जपानच्या केंटो मोमोटावर २१-१२, १५-२१, २१-१५ असा विजय साजरा केला़    उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयला डेन्मार्कच्या विक्टर अ‍ॅक्सेल्सेनविरुद्ध, तर श्रीकांतला जपानच्या ताकुमा युएडाविरुद्ध खेळावे लागेल़  भारताच्याच आर. एम. व्ही. गुरुसाईदत्तने १८-२१, २१-१९, २१-१८ अशा फरकाने समीर वर्माचा पराभव केला.