आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीमध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अव्वल दहा फलंदाजांच्या यादीमध्ये भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सलामीवीर शिखर धवन यांचा समावेश आहे. या क्रमवारीत अव्वल स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा ए बी डी’व्हिलियर्स आहे.
गोलंदाजांमध्ये अव्वल दहा जणांच्या यादीत फिरकीपटू आर. अश्विन हा एकमेव खेळाडू आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया युवा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क प्रथम स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर दुसऱ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडवर २-१ असा विजय मिळवल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.