कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभवालासामोरे जावे लागल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू Lionel Messi लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फूटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. जगभरात कोटय़वधी चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्या मेस्सीने पाच वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान पटकावला आहे आणि कारकीर्दीत अनेक यशोशिखरे पादाक्रांत करून दिग्गज पेले आणि दिएगो मॅरेडोना यांच्या पंक्तीत स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मेस्सीच्या या अचानक निवृत्तीच्या घोषणेने फुटबॉल जगताला धक्का बसला आहे.

जाणून घ्या, मेस्सीचे फुटबॉल जगतातील विक्रम

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मेस्सी म्हणाला की, हा माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे. मी लॉकर रुममध्ये परतल्यानंतर मनात विचार आला की आता माझं करिअर संपुष्टात आलं आहे. मला आता थांबायला हवं.

वाचा: चिली अर्जेंटिनाला ‘तिखट’, मेस्सीचे स्वप्न अधुरेच

मेस्सीचे हे विधान ऐकताच स्टेडियमवर उपस्थित सर्वच थक्क झाले. अर्जेंटिनाच्या आतापर्यंतच्या विजयात मेस्सीचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मात्र, कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद हे अजूनही या दिग्गज खेळाडूला आपल्या नावे करता आले नाही. चिलीविरुद्धच्या सामन्यात देखील मेस्सीला सुर गवसला नाही. पेनल्टी शूटआऊटमध्येही मेस्सीला गोलपोस्टचा लक्ष्यवेध घेता आला नाही. त्यानंतर मेस्सी खूप निराश झालेला पाहायला मिळाला.

तुम्हाला काय वाटतं? मत नोंदवा-

 

आणखी वाचा-