अजाक्सला नमवून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेतील प्रवेश निश्चित ; पोग्बा व मॅखिटारीन यांचे प्रत्येकी एक गोल

मँचेस्टर स्टेडियमवर  झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना गुरुवारी स्थानिक क्लब मँचेस्टर युनायटेडने विजयी चषक उंचावून श्रद्धांजली वाहिली. युरोपा लीग फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम लढतीत युनायटेडने २-० अशा फरकाने अजाक्सवर विजय मिळवून जेतेपद पटकावले. पॉल पोग्बा व हेन्रिक मॅखिटारीन यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर युनायटेडने हा विजय मिळवला आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या पुढील मोसमातील प्रवेशही निश्चित केला.

Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
hardik pandya marathi news, hardik pandya mumbai indians marathi news
दोन सामने, दोन पराभव, दोन मोठ्या चुका! कर्णधार हार्दिक पंड्याचे डावपेच मुंबई इंडियन्ससाठी मारक ठरत आहेत का?

सामन्यापूर्वी दोन्ही क्लबच्या खेळाडूंनी दोन मिनिटे मौन धारण करून मँचेस्टर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २२ नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या ताफ्याच्या देखरेखीखाली हा सामना खेळविण्यात आला. युनायटेडच्या खेळाडूंनी आपल्या हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निशेष केला. या लढतीसाठी उपस्थित असलेले ५० हजारांहून अधिक प्रेक्षकांनीही आपापल्या परिने हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. या भावनिक वातावरणात खेळविण्यात आलेल्या लढतीत पोग्बाने १८व्या मिनिटाला, तर मॅखिटारीनने ४८व्या मिनिटाला युनायटेडसाठी गोल केले.

  • ०५ : चॅम्पियन्स लीग, क्लब विश्वचषक आणि युरोपा लीग या युरोपातिल प्रमुख स्पर्धा जिंकणारा मँचेस्टर युनायटेड हा पाचवा क्लब आहे. याआधी युव्हेंट्स, अजाक्स, बायर्न म्युनिच आणि चेल्सी यांनी ही कामगिरी केली आहे.
  • ०४ : युरोपातील चारही महत्त्वाच्या स्पर्धा प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी जिंकल्या आहेत. त्यांनी २००३ मध्ये युएफा चषक उंचावला होता त्यानंतर दोन वेळा युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे.
  • २२ : अजाक्स क्लब २२ वष्रे आणि २८२ दिवसांच्या कालावधीनंतर पहिल्यांदा महत्त्वाच्या स्पध्रेच्या अंतिम फेरीत खेळला. यापूर्वी १९९६ मध्ये चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या अंतिम फेरीत त्यांना युव्हेंट्सकडून पराभव पत्करावा लागला होता.

अन् चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलले

  • ४८ तासांपूर्वी मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सर्व जगाला हादरवले. मँचेस्टर शहरात तर शोककळा पसरली होती आणि जणू दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र, बुधवारी मध्यरात्री स्टॉकहोम स्टेडियमवर मँचेस्टर युनायटेड क्लबने युरोपा लीगचा चषक उंचावून हे दहशतीचे मळभ दूर करण्यात हातभार लावला. युनायटेडच्या या जेतेपदाने फुटबॉल चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवले.

पुढील काही वर्ष मला या पदावर आतातरी काम करायला मिळेल. माझ्या मार्गदर्शनाखाली क्लबला अनेक पराभव सहन करावे लागले, तर दुसरीकडे इतर जण सातत्याने जिंकत होते आणि ते मला जमले नाही. या निराशाजनक हंगामात मी स्वत:ला जगातील सर्वात वाईट प्रशिक्षक समजत होतो. पण, याच मोसमात आम्ही तीन जेतेपद पटकावली आणि आजच्या या विजयाने आम्ही चॅम्पियन्स लीगची पात्रताही मिळवली.  – जोस मॉरिन्हो, मँचेस्टर युनायटेड क्लबचे प्रशिक्षक