प्रवीण अमरे यांचा मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा करार येत्या तीन दिवसांत संपत आहे. मात्र, या पदावर त्यांना पुन्हा कायम ठेवण्यात येते की त्यांच्या जागी अन्य कोणाची वर्णी लागते, याबाबत संभ्रमाचे वातावरण आह़े  अमरे यांना करार वाढवून घेण्याची इच्छा नाही, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. तर करार वाढवायचा की नाही, हा निर्णय एमसीए घेईल, असे अमरे म्हणतात. त्यामुळे या संभ्रमात अधिक भर पडली आह़े
‘‘३१ मार्चला माझ्या कराराची मुदत संपुष्टात येत आह़े  त्यामुळे या पदावर मला कायम ठेवायचे की नाही, हा निर्णय एमसीएने घ्यावा,’’ असे अमरे यांनी सांगितले. मात्र, एमसीएचे सहसचिव नितील दलाल म्हणाले की, ‘‘अमरे यांना आपला प्रशिक्षकपदाचा करार वाढवायचा नाही़  तसेच एमसीएच्या क्रिकेट सुधारणा समितीचे (सीआसी) अध्यक्ष माधव आपटे हे विविध गटाच्या संघाच्या प्रशिक्षकांबाबतचा निर्णय घेतील़ ’’

हॅमिल्टनला पोल पोझिशन
सेपांग : मर्सिडिजचा लुइस हॅमिल्टन रविवारी मलेशियन ग्रां. प्रि. स्पध्रेत अव्वल स्थानावरून सुरुवात करणार आह़े  मुसळधार पावसाशी झुंजत हॅमिल्टनने फेरारीच्या सेबेस्टियन वेटलला मागे टाकून एक मिनिट ४९.८३ सेकंदाची वेळ नोंदवली़