पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने बुधवारी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना सामन्यातील विजयानंतर ‘पुश-अप’ मारण्यास बंदी घातली आहे. पाकिस्तानी राजकीय नेत्यांकडून पाक क्रिकेट बोर्डावर खेळाडूंच्या ‘पुश-अप’ मारण्यास बंदीसाठीचा दबाव वाढत होता. अखेर पीसीबीने पाकिस्तानी खेळाडूंना ‘पुश-अप’ मारण्यास बंदी घालण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या एका समितीला पीबीसीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी ही माहिती दिली.

VIDEO: .. म्हणून मिसबाहने मैदानावर मारल्या दहा पुश-अप्स

मिळालेल्या माहितीनुसार, पाकच्या देशाअंतर्गत समन्वय समितीच्या एका बैठकीवेळी राजकीय नेत्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी ‘पुश-अप’ मारण्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. मिसबाहला त्याच्या कृत्याविषची जाब विचारला असता पाकिस्तानी लष्कराला दिलेल्या वचनाची पुर्तता केल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले.

वाचा: पाकिस्तान संघाचे पुश-अप्स सेलिब्रेशन

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर कर्णधार मिसबाह-उल-हक याने मैदानात ‘पुश-अप’ मारल्या होत्या. यानंतर कर्णधाराचे अनुकरण करत पाकच्या इतर खेळाडूंनीही लॉर्ड्सच्या मैदानात ‘पुश-अप’ मारल्या होत्या.