कोल्हापूरचा विक्रम मोरे कुमार केसरीचा मानकरी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा राज्यस्तरीय ‘कामगार केसरी’ किताब सांगलीच्या वैभव रास्करने, तर ‘कुमार केसरी’ किताब कोल्हापूरच्या विक्रम मोरेने पटकावला.

‘कामगार केसरी’ची अंतिम लढत कुंडल येथील बापू लाड क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखान्याचा पलवान वैभव रास्कर आणि किसनवीर बापू सहकारी साखर कारखान्याच्या (सातारा) विकास पाटील यांच्यात रंगली. तांत्रिक गुणांच्या जोरावर रास्करने पाटीलवर मात केली. सानिकेत राऊतने (कुंभी कासारी) तृतीय क्रमांक पटकावला.

कामगारांच्या मुलांसाठी झालेल्या ‘कुमार केसरी’ स्पध्रेत कोल्हापूरच्या कुंभी कासरी येथील विक्रम मोरे आणि भोगावती सहकारी साखर कारखानाच्या सरदार बरगे यांच्यात लढत झाली. तांत्रिक गुणावर विक्रम मोरेने विजेतेपद मिळवले. साईराम चौगुलेने तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवला.

अन्य निकाल

गट पहिला (५७ किलोपर्यंत) : १. नामदेव घाडगे (दूधगंगा), २. भूषण पाटील (कुंभी कासारी), ३. शुभम पाटील  (कुंभी कासारी); गट दुसरा (६१ किलोपर्यंत) : १. दिलीप शेंबडे (कुंभी कासारी), २. सचिन पाटील  (सद्गुरू सहकारी), ३. प्रकाश पाटील  (कुंभी कासारी);  गट तिसला (६५ किलोपर्यंत) : १. अमोल पवार (बापू लाड अग्रणी), २. आफताब पठाण (कुंभी कासारी), ३. अनिकेत घाटकर (दुधगंगा); गट चौथा (७०\ किलोपर्यंत) : १. दिग्विजय जाधव (तात्यासाहेब कोरे), २. अनिकेत पाटील (तात्यासाहेब कोरे), ३. नवनाथ गोटम (कुंभी कासारी); गट पाचवा (७४ किलोपर्यंत) : १. भगतसिंह खोत  (कुंभी कासारी,), २. अंकुश माने (बापू लाड), ३. सागर पाटील (कुंभी कासारी)

 

अंकुर मित्तलला सुवर्ण

नवी दिल्ली : भारताच्या अंकुर मित्तलने अ‍ॅकाप्युलको (मेक्सिको) येथे सुरू असलेल्या शॉटगन विश्वचषकात डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटला नमवत अंकुरने सुवर्णदक पटकावले. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषकात विलेटने सुवर्णपदकावर कब्जा केला होता आणि अंकुरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

सहा जणांच्या अंतिम फेरीत अंकुरने ८० पैकी ७५ गुणांची कमाई केली आणि या स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले. पात्रता फेरीत अंकुरने द्वितीय स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत ८० पैकी फक्त पाचच वेळा अंकुरला लक्ष्याचा भेद करता आला नाही. ७५ गुणांसह अंकुरने विश्वविक्रमाला गवसणी घातली.

पुरुष आणि महिला स्कीट प्रकाराच्या लढती बाकी असून, रश्मी राठोड महिला स्कीट प्रकारात भारताची एकमेव प्रतिनिधी आहे. अंगद वीर सिंग बाजवा, मान सिंग, अमरिंदर चीमा पुरुष गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.