मद्याच्या सेवनामुळे हृदयविकार बळावू शकतो, असे अमेरिकी शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. अल्कोहोलच्या सेवनाने प्रसंगी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, त्याचबरोबर हृदयासंबंधित इतर आजार बळावण्याचीही शक्यता आहे, असे या संशोधकांनी सांगितले.

अल्प प्रमाणातही अल्कोहोलच्या सेवनामुळे हृदयविकार होत नाही, असे अनेक संशोधकांनी म्हटले आहे. मात्र अमेरिकेच्या या संशोधकांनी हा मुद्दा खोडून काढला आहे. अल्कोहोलचे कमी किंवा अति प्रमाण हे आरोग्याला हानिकारकच असल्याचे म्हटले आहे.

Pune, man theft, theft in Neighbor house,
पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

यूसीएसएफचे जॉर्ज मारकस यांच्या म्हणण्यानुसार, अल्कोहोलचे मर्यादित सेवन हे हृदयविकाराविरोधात उपयुक्त असल्याचा दाखला वेगवेगळ्या संशोधनातून बऱ्याचदा देण्यात आला आहे, पण संशोधनातील काही निष्कर्षांतून अल्कोहोलच्या सेवनातून हा धोका अधिक बळावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

अल्कोहोलच्या सेवनामुळे उत्तेजित होणे किंवा छातीत धडधडल्यामुळे हा धोका अधिक बळावत असल्याचे लाखो रुग्णांच्या परीक्षणातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन हे मुळातच हृदय आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या यांच्यासाठी हितकारक नसून उलट तो विषारी घटक आहे. संशोधकांनी १४ कोटी ७२ लाख ७ हजार ५९१ लोकांच्या केलेल्या सर्वेक्षणातूनदेखील हेच सिद्ध होताना २६ लाख ८ हजार ८४ म्हणजे १.८ टक्के लोक हे अल्कोहोलच्या घातक परिणामांचे बळी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. हे सर्वेक्षण ‘अमेरिकन कॉलेज कार्डिओलॉजी’ (जेएसीसी) या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.

 

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)