१ जून २०११ रोजी गरोदर माता व आजारी असणाऱ्या नवजात (३० दिवसांपर्यंतच्या) अर्भकांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेचे घटक

*  सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये प्रसूती होणाऱ्या मातांना संपूर्णत: मोफत प्रसुती सेवा पुरवली जाते.

*  या सेवांमध्ये मातेला मोफत औषधे व शुश्रूषा, सामान्य प्रसूती झाल्यास ३ दिवसांपर्यंतचा आहार व सिझेरियन झाले असल्यास ७ दिवसांपर्यंतचा आहार दिला जातो. तसेच मोफत निदान सेवा, रक्त पुरवठा, घरापासून दवाखान्यापर्यंत वाहतूक सेवा, संदर्भसेवांसाठीच्या वाहतूक सेवा तसेच सुट्टी झाल्यावर दवाखान्यापासून घरापर्यंत वाहतूक सेवा मोफत दिल्या जातात.

*  सार्वजनिक आरोग्य सेवा घेताना ‘माता व नवजात बालकांचा’ करावा लागणारा जास्तीचा खर्च वाचावा हा खरा या योजनेमागचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ किमान १२० लाख मातांना देण्याचे उद्दिष्ट आहे.

*  आरोग्याच्या निर्देशांकामध्ये मागे पडलेल्या २१ राज्यांमधील २६४ जिल्हे विशेष लक्ष्य म्हणून निवडण्यात आले आहेत. या भागामध्ये अनुसूचित जाती व जमातींचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते.

*  वर उल्लेखिलेल्या वाहतूक सेवा देण्यासाठी लाभार्थी महिलांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक इ. एकत्र करून ‘माता व बालक शोध सेवा’ ((mother & child tracking system)तयार करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी माता व बालकांना वाहतूक सेवा पुरविणे, लसीकरण तसेच प्रसूती पश्चात सर्व सेवा पुरविण्यासाठी या यंत्रणेचा वापर करता येईल.