ऑफिसमध्ये दहा-बारा तास काम करणाऱ्या व्यक्तींनी ‘समकायासन’ रोज करणे आवश्यक आहे. एकाच स्थितीमध्ये बसून काम केल्यामुळे पाठीच्या कण्याचे विकार उद्भवतात म्हणून खास पाठीच्या कण्याच्या व्यायामाच्या दृष्टीने ‘समकायासन’ केले जाते. हे आसन करायला अतिशय सोपे आहे. यामध्ये स्थिरताही राखता येते. हे एक बैठे आसन आहे.

प्रथम पद्मासनात बसावे. मग आपले दोन्ही हात कमरेजवळ जमिनीवर ठेवावेत. दोन्ही हातांची बोटे दोन्ही बाजूस बाहेर करून पाठीच्या रेषेत हात ठेवावेत. दोन्ही हात कोपरांमध्ये ताठ असावेत. डोके आणि खांदे उचलले जातील एवढे ताठ करावेत. किंचित बैठकही उचलावी. ही स्थिती पंधरा सेकंदापर्यंत टिकवता येते. स्थिरता आल्यावर मान मागे टाकून आकाशाकडे नजर जाईल तोपर्यंत पाहावे. हनुवटी कंठखुपामध्ये बसवून दृष्टी नासिकाग्राकडे करावी. अशाही स्थितीत पंधरा सेकंदापर्यंत रहाता येते. नियमित सरावाने या आसनाचा कालावधी दोन मिनिटांपर्यंत वाढवता येतो. हे आसन केव्हाही केले तरी चालते. खास पाठीच्या कण्याच्या व्यायामासाठी करायचे हे सोपे आसन वयोवृद्ध लोकांनीही केल्यास चांगले.

The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

या आसनाचे अनेक फायदे आहेत. आपण पद्मासनात बसल्यामुळे पद्मासनाचे फायदे मिळतात. हातांचे स्नायू मजबूत होतात. पुढचा भाग उचलला गेल्याने पोटात एक प्रकारची पोकळी उत्पन्न होते. ही पोकळी आरोग्यदायी ठरते. या पोकळीमुळेच गॅसेसचा त्रास कमी होतो व अपानवायुचा निचरा होतो. हातावर शरीर सरळ उचलल्यामुळे पाठीचा कणा सरळ होऊन त्याचा हळूवारपणे व्यायाम होतो. यामुळे जर मणका सरकला असेल तर ती गॅप भरून निघते. समकायासन नियमित केल्यामुळे स्लिप डिस्कसारखे विकार बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच पाठदुखीने त्रस्त असलेल्या सर्वांनी तसेच गॅसेसचा त्रास होत असलेल्या व दिर्घकाळ बैठे काम करणाऱ्यांनी हे आसन जरुर करावे.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ