बनवायला सोपी आणि सुपर रिफ्रेशिंग, उन्हाळ्यात अवश्य प्यावी अशी ही स्मुदी आहे.पपई हनी स्मुदी (दोन जणांसाठी)साहित्य१ कप पपईचे कापलेले तुकडेअर्धा कप थंड दूध१ कप घट्ट दहीअर्धा कप व्हेनिला आईस्क्रिम१ चमचा मधथोडस केशर (एक चमचा कोमट दुधात बुडवून ठेवा)कृतीब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.(सौजन्य : निता मेहता)