चार वर्षांचा अनिकेत दरवाजातून आत आला आणि एकदम त्याच्या नखांकडे लक्ष गेले. नखांमध्ये खडूचा पांढरा भुगा दिसत होता. लगेच काही निष्कर्ष काढण्याअगोदर आईला बोलण्याची संधी द्यावी म्हणून विचारले, ‘बोला’. आई म्हणाली, ‘अहो डॉक्टर, शाळेतून रोज तक्रार येते, हा बाईला वर्गात शिकवण्यासाठी खडूच शिल्लक ठेवत नाही. मला वाटले गंमत म्हणून खात असेल. तरी मी म्हणायचे की, याच्याकडे खडू, पेन्सिल का टिकत नाहीत. काल कहरच झाला. याच्याबरोबर बागेत खेळणाऱ्या समीरने सांगितले की, हा खेळताना कधी कधी मातीही खातो. हे कळल्यावर मात्र मी लगेच आज आले तुमच्याकडे. त्या दिवशी पाहुण्यांकडे गेलो तर तिथे हा भिंत चाटत होता. मला एवढी लाज वाटली. त्या पाहुण्यांनी सांगितले की, कॅल्शियम कमी असल्याने होते असे. कारण त्यांची सून गरोदर असताना तिलाही माती, खडू खाण्याची इच्छा व्हायची. मग म्हटले याचे कॅल्शियम तरी तपासून पाहू.’

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

मी अनिकेतच्या आईचे सगळे बोलणे संपू दिले. असे माती खाणारे रुग्ण रोजच्या बाह्य़रुग्ण विभागात एक दोन तरी असतात. म्हणून हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर जराही तणाव नव्हता. पण त्यामुळे अनिकेतची आई अजूनच गोंधळली. आता जास्त उत्सुकता न ताणता मी बोलायला सुरुवात केली. वाढत्या वयाच्या मुलामुलींमध्ये, गरोदर स्त्रियांमध्ये माती, पेन्सिल, खडू, खडे, वाळू खाणे आणि भिंत चाटणे ही समस्या अनेकदा दिसून येते. आमच्या बालरोगशास्त्राच्या भाषेत आम्ही याला ‘पायका’ म्हणतो. जितका हा आजार सर्वत्र दिसतो, तितकेच त्याच्या उपचार व कारणांबद्दल गैरसमज आहेत. ही समस्या शरीरातील लोह म्हणजे आयर्न कमी झाल्याने होते. लोह असलेले औषध ६ मिलीग्राम प्रति किलो या डोसमध्ये तीन महिने दिल्याने ही सवय जाते. मुळात लोह कमी झाल्याने अ‍ॅनिमिया होतो व त्यामुळे मेंदूतील काही रसायने कमी पडून न खाण्याजोग्या वस्तू खाण्याची अशी इच्छा निर्माण होते. तीन महिने लोह असलेले औषध घेण्याव्यतिरिक्त लोहाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थही रोजच्या आहारात वाढवावे. उदाहरणार्थ गूळ, सफरचंद, काळी खजूर, पालक व इतर हिरव्या भाज्या, मनुका, जर्दाळू. पण फक्त या गोष्टी आहारात वाढवून ही सवय जाणार नाही आणि औषध घेणे अनिवार्य आहे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की ही सवय कॅल्शियम कमी असल्याने जडते पण ते खरे नाही. आजही बरेच जनरल प्रॅक्टिशनर या आजारासाठी कॅल्शियमचे टॉनिक लिहून देतात पण लोह घेतल्याशिवाय ही सवय जात नाही, तसेच ही सवय गेल्यावर शरीरातील लोहाचे साठे पूर्ववत करण्यासाठी अजून तीन महिने लोहाचे टॉनिक सुरू ठेवावे.

‘डॉक्टर अजून एक समस्या होती. गेल्या काही महिन्यांपासून याचे पोट अधूनमधून दुखत असते.’ मी या प्रश्नाची वाटच पाहत होतो. माती खाण्याची सवय असलेल्या प्रत्येक मुलाला हे होतेच. याचे कारण माती खाल्ल्याने पोटात जाणारे जंत. यासाठी अल्बेंडेझोल हे औषध रोज रात्री तीन दिवस घ्यायचे. हे सगळे लिहून दिल्यावर आईने जाताना विचारले, ‘अजून काही काळजी घायची?’ काळजी आजारापेक्षा औषधाच्या बाबतीत घ्यायची. लोह हे पचायला जड असते. ते पूर्ण नीट पचावे म्हणून रिकाम्या पोटी द्यावे. शक्यतो रात्री झोपताना पण खाण्याच्या दोन-तीन तास नंतर दिलेले बरे. त्या सोबत शक्यतो इतर कुठले औषध देऊ  नये. याने एखाद्या वेळी पोट दुखणे, दात-जीभ काळी पडणे आणि शौचाला कडक होणे असा त्रास संभवू शकतो. पण हा त्रास झाला तरी कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळे औषध बंद करू नका.

www.amolaannadate.com