आज राष्ट्रीय युवक दिन’! तरुण वय म्हणजे जगण्याचा एकदम हॅपनिंगकालखंड! पण आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, तर वेळीअवेळी आणि वारंवार होणारे बाहेरचे खाणे, व्यायामाचा कंटाळा, अभ्यास, करिअर, मित्रमंडळी, प्रेमसंबंध अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरताना मनावर येणारा आणि दुर्लक्षित राहणारा ताण, मित्रांच्या संगतीने आयुष्यात कधी तरी होणारा मद्यपान वा धूम्रपानाचा प्रवेश, अशा कित्येक गोष्टी या वयात घडत असतात. आपल्या अनेक सवयी पौगंडावस्थेत आणि नंतर तरुणपणी तयार होतात आणि पुढे आयुष्यभर आपण त्यानुसार वागतो, असे अनेक वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मग तरुण असतानाच आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या तर?..  

जयश्री तोडकर बॅरिअट्रिक सर्जन

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

हेल्थीअसणे म्हणजे काय?

पौगंडावस्थेतील मुले आणि युवकांच्या झालेल्या अनेक आरोग्यविषयक अभ्यासांमध्ये ‘हेल्थी’ असणे म्हणजे काय, या मूळ संकल्पनेबद्दलच गोंधळ असलेला दिसतो. बऱ्याच मुलामुलींच्या मते ‘हेल्थी’ म्हणजे एक तर धष्टपुष्ट/ जाडजूड किंवा ‘हेल्थी’ असण्याचे दुसरे टोक म्हणजे ‘झीरो फिगर’! आरोग्याची ही व्याख्या फक्त वरवरच्या दिसण्यावरून ठरवलेली. आरोग्य म्हणजे खरे तर ‘फिटनेस’. ‘सिक्स पॅक अ‍ॅब्ज’ किंवा ‘झीरो फिगर’ त्यात महत्त्वाची नसून सशक्त, निरोगी, चपळ, काटक असणे अभिप्रेत आहे. त्यामुळे मुळात आपली आरोग्याची संकल्पना काय हे तपासून घ्यायला हवे, आणि ते तरुण वयातच, किंबहुना त्याही आधीच व्हायला हवे.

आपण भारतीय लोक जनुकीयदृष्टय़ा मधुमेह आणि लठ्ठपणाच्या अधिक जवळ असतो. स्वादुपिंडातील ‘बीटा सेल’मधून तयार होणाऱ्या इन्शुलिनचे कार्य आपल्या जनुकीय रचनेनुसारच काहीसे कमी असते. स्नायूंमुळे इन्शुलिनची कार्यक्षमता वाढते, पण आपल्या शरीरात स्नायूही पातळ (थिन मसल) असतात. अधिकाधिक बैठी जीवनशैली आणि जोडीला मानसिक ताण हे आहेच. शिवाय आपली संस्कृती ‘सेलिब्रेशन कल्चर’ प्रकारातली. कोणतीही गोष्ट साजरी करण्याला विरोध असण्याचे कारण नाही, पण सणासुदीच्या निमित्ताने आवडते पदार्थ नेहमी आणि भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आरोग्याबद्दल तरुणपणीच जागरूक का व्हायला हवे याचे महत्त्वही लक्षात येईल. ‘आत्ता भरपूर फास्ट फूड किंवा गोडधोड खाऊन घेतो, नंतर मधुमेह झाला की हे खाता येणार नाही,’ ही मानसिकता योग्य नव्हे.

लठ्ठ लहान मूल पौगंडावस्थेतही लठ्ठच राहते, पुढे तरुणपणीही कायम राहिलेला लठ्ठपणा मध्यमवयातही टिकतो, असे अनेकांच्या बाबतीत बघायला मिळते. बरेचसे आजार लठ्ठपणाशी जोडले गेलेले असतात. अवघ्या बावीस-तेवीस वर्षांच्या वयात मधुमेह जडलेली मुले, ‘पॉलिसिस्टिक ओव्हरिअन डिसिज’चा त्रास असलेल्या तरुण मुली ही त्यातलीच काही उदाहरणे असू शकतात. लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्याचा संबंध केवळ भौतिकदृष्टय़ा बारीक किंवा जाड असण्याशी (म्हणजे फक्त ‘शेप/ साइझ’शी) नाही, हे आधी समजून घ्यायला हवे. लठ्ठपणाच्या मागे मोठे शास्त्र आहे. त्यामुळे ‘शेप आणि साइझ’ या वरवरच्या गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा ‘फिटनेस’ तरुणपणीच समजून घेतला, तर पुढेही ती एक चांगली सवय बनून जाईल.

व्यसने नकोतच!

‘‘अनेकदा व्यसने लागण्यात ‘पीअर प्रेशर’चा, म्हणजे बरोबरीच्या किंवा मोठय़ा मित्रमंडळींचा प्रभाव खूप असतो. या वयात नवीन, वेगळे, ‘थ्रिलिंग’ करावे असे वाटते असते. यात कधीतरी दारू पिऊन बघणे किंवा सिगारेट ओढून बघण्यापासून सुरूवात होते. संगत आणि आकर्षणामुळे महाविद्यालयीन वयात ‘ड्रग्ज’चा अनुभवही काही मुले घेऊन बघतात. यातील कशाचेही व्यसन घातकच. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ‘कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्स’ची आवड याच वयात निर्माण होते. त्याचेही पुढे व्यसन लागू शकते, हे लक्षात घ्यायला हवे.’’

डॉ. अविनाश भोंडवे, फिजिशियन

हे लक्षात असू द्या!

साखर हे खरे तर अनैसर्गिक अन्न आहे! आपण जे-जे खातो त्याची शरीरात जाऊन साखरच बनते. कोणत्याही पदार्थात वरून साखर घालून खाणारा माणूस हा एकमेव प्राणी! आपल्याला खरेच इतक्या साखरेची आवश्यकता आहे का, याचा एकदा विचार करू या. शरीराला मीठही गरजेपुरतेच हवे असते, हेही लक्षात हवे.

जेवताना किंवा काहीही खाताना ‘अ‍ॅनिमल व्हिज्डम’ लक्षात ठेवू या. कोणताही प्राणी निव्वळ आवडते म्हणून अन्न पोटात ढकलत नाही. याचा अर्थ गोडधोड, ‘फास्ट फूड’ कधीच खाऊ नका, असे नव्हे. आवडते पदार्थ कधी तरी खाण्यास काहीच हरकत नसावी. पण दररोज ते खायचे का आणि खाताना कुठे थांबायचे याची आपली आपणच मर्यादा घालून घेऊ या.

प्रक्रिया केलेले पदार्थ (प्रोसेस्ड फूड) ही एक सोय आहे हे खरे. पण ते एक प्रकारे शिळेच अन्न आहे. त्यातील मीठाचे अतिप्रमाणही लक्षात हवे.

नियमित व्यायामाची चांगली सवय पौगंडावस्थेत आणि तरुणपणीच लावून घेतली तर ती पुढेही कायम राहील.

मनाकडे दुर्लक्ष नको!

बऱ्याचदा घरातून वेगवेगळ्या कारणांसाठी जाणवणारा दबाव, अभ्यासात मनासारखी कामगिरी करता न येणे, प्रेम प्रकरणातील गुंतागुंती, व्यसने, अशा विविध कारणांमुळे वैफल्याची भावना आलेले तरूण अनेकदा बघायला मिळतात. त्यात संवाद हरवत चालल्यामुळे मनातल्या भावना अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सांगितल्या जात नाहीत. अशा वातावरणात वावरताना आपले मनस्वास्थ्य आपणच कटाक्षाने जपायला हवे.

अति स्पर्धात्मकता नको. स्पर्धा हा जीवनाचा अपरिहार्य भाग असला तरी अति प्रमाणात स्पर्धा मानसिक आरोग्यास घातकच.

अपेक्षांचे ओझे स्वतकडून असलेल्या अपेक्षा आणि मिळवलेले यश यात तफावत असली की ते नराश्याचे कारण बनते. त्यामुळे वास्तववादी दृष्टिकोन असणे आवश्यक आहे.

व्यसन  व्यसन कुठल्याही गोष्टीचे असो. तरूण वयात त्याचा कितीही मोह झाला, तरी त्या व्यसनाचा गंभीर परिणाम लक्षात घेणे गरजेचे. पुरेशी झोप ही तर निरोगी मानसिक आरोग्याची गुरुकिल्लीच.

ताणाचे व्यवस्थापन तणाव हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक. पण ताणाच्या व्यवस्थापनासाठीही उपाय आहेत. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, कुटुंबातील मंडळी व मित्रपरिवाराशी सुसंवाद, आवडीचा छंद जोपासणे या गोष्टी त्यासाठी फायदेशीर ठरतात.

तंत्रज्ञान महत्त्वाचेच, पण त्याचा अतिरेक नको! व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि एकूणच मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सचा अति वापरही मानसिक ताण वाढवतो.

डॉ. स्वप्नील देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ