व्हिएतनाम म्हटले की डोळ्यासमोर अमेरिका-व्हिएतनाम युद्धाचेच प्रसंग येतात. पण याच व्हिएतनामध्ये निसर्गरम्य अशी काही मोहक ठिकाणंदेखील आहेत. इतकेच नाही तर तेथील माणसं देखील तेवढीच लोभस आहेत. तेथील सापा व्हॅलीची भ्रमंती केली की हे लगेच आपल्या लक्षात येते.

अमेरिका-व्हिएतनाम युद्धामुळे व्हिएतनाम जगाच्या नकाशावर प्रकाशात आलं. अमेरिकी फौजांना जेरीस आणल्यामुळे व्हिएतनामची वेगळी ओळख निर्माण झाली. व्हिएतनाम हे भारताचे मित्रराष्ट्र. पण बऱ्याच अंशी चीनचं वर्चस्व असलेला देश. पर्यटनाच्या नकाशावर तसा फार याचा गवगवा नाही. पण येथील होईअन हा लाँग बे आणि सापा व्हॅली ही पाहताक्षणी प्रेमात पाडणारी ठिकाणं.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?

सापा व्हॅली हा परिसर तर जणू काही भुरळ पाडणाराच. लांबच लांब पसरलेल्या डोंगररांगा आणि त्याच्या उतारावरची भातशेती. सारं काही मोहून टाकणारं दृश्य. या प्रदेशात राहणाऱ्या ह्य़ॅमोंग लोकांची छायाचित्रं ट्रॅव्हल ब्लॉग्जमधून झळकत असतात. कुतूहल जागृत करणारी ही माणसं एकदा तरी पाहायला हवीत असं वाटतं. हे ह्य़ॅमोंग लोक व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागात चीनच्या सीमेजवळ राहतात. हा प्रदेश पूर्णत: डोंगराळ. पाऊस आणि धुक्याचं येथे कायम साम्राज्य. आपण भेट देऊ तेव्हा नेमकं वातावरण कसं हे सांगणं तसं अवघडच.

सापाचा हा सारा परिसर प्रसिद्ध आहे तीन मुख्य गोष्टींसाठी. पारंपरिक ह्य़ॅमोंग लोकांसाठी, भातशेतीसाठी आणि ट्रेकिंगसाठी. इथे जायचं ते ह्य़ॅमोंग लोकांना जवळून पाहण्यासाठी, त्यांची प्रसन्न, सुंदर छबी कॅमेऱ्यात उतरवायची. त्यांची जीवनशैली अनुभवायची. पर्यटनातला हा एक वेगळा अनुभव.

खूप साऱ्या रंगांची उधळण केलेले पारंपरिक पोशाख हे यांचं वैशिष्टय़. एकूण २७ उपजातींमध्ये हे विभागले आहेत. यांच्या पारंपरिक पोशाखाचेही जातीनुसार वेगवेगळे रंग आहेत. पर्यटकांना हे सहज ओळखता यावेत म्हणून रंगांनुसार यांना नावं दिली गेली आहेत. ब्लॅक, रेड, फ्लॉवर, ग्रीन, स्ट्राइप्ड, ब्लू ह्य़ॅमोंग अशा नावांनीच ते ओळखले जातात.

या भागात कुठेही भटकताना आपल्याला दिसतात त्या नाजूक भरतकाम असलेले रंगीबेरंगी कपडे घातलेल्या आणि पाठीवरच्या झोळीत आपल्या बाळांना घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया. उपजीविकेचं साधन म्हणून या स्त्रिया दिवसभर कापडावर भरतकाम करून त्यापासून बॅग्ज, पाकिटं, शॉल, स्कार्फ बनवतात आणि ते पर्यटकांना विकण्यासाठी दऱ्याखोऱ्यांत भटकतात.

या सर्व परिसरात आठवडाभर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावांमध्ये आठवडी बाजार भरतो, हा रंगांनी बहरलेला बाजार अगदी बघत राहण्यासारखा असतो. फळे, फुले, भाज्या, मांस, कपडे, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू एवढंच नाही गुरं, डुकरं, कुत्रे, मांजरी, म्हशी अशा सगळ्या गोष्टी इथे विक्रीसाठी असतात. विशेष म्हणजे हा सगळा व्यवहार स्त्रियाच पार पाडतात. बाजार आटोपल्यावर डोंगरातल्या घरी चालत जाऊन त्या घरकामही करतात, मुला-बाळांनाही सांभाळतात आणि शेतीपण करतात. खरोखरच कौतुक केल्यावाचून राहवत नाही.एकाच दिवसात चारही ऋतूंचा अनुभव येथे मिळतो. सकाळी गोठवणारी थंडी, दुपारी ऊन, मधेच पावसाची सर आणि रात्री पुन्हा थंडी असं इथलं मिश्र वातावरण असतं. आपल्या सह्य़ाद्रीसारखी साधारण भौगोलिक रचना. तीन-चार हजार फूट उंचीच्या डोंगररांगा. गावागावांना जोडणाऱ्या पारंपरिक वाटांना आता ट्रेकिंग रूटचं स्वरूप आलं आहे. या वाटांवरून भटकण्यासाठी मार्गदर्शक सहज मिळतात. राहण्यासाठी काही ठिकाणी विश्रामगृहं तर काही ठिकाणी टेंटची सुविधा आहे. त्यातल्या त्यात मार्च ते मे हा या भागात जाण्यासाठी उत्तम कालावधी आहे.सापा व्हॅलीला जाण्यासाठी विमानाने हनोई आणि हनोईहून ट्रेनचा आठ तासांचा प्रवास करून लाओ काई हे छोटेखानी शहर गाठावं लागतं. तिथून पुढे पंचवीस किलोमीटरवर सापा हे गाव लागतं. लाओ काईपासून सापाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.

अमित बोरोले trekamit@gmail.com