lp03बनारसचा घाट हा सर्व वयोगटातील चित्र— छायाचित्रकारांना विषय म्हणून नेहमीच पुरून उरतो. म्हणूनच त्या सर्व चित्रांमध्ये आपल्या चित्राचे वेगळेपण राखणे हा कलावंतांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिलेला भाग असतो. कोलकात्याच्या आशिफ होसैन याने तेथील सरकारी आर्ट स्कूलमधून प्रशिक्षण घेतले आणि नंतर वारसास्थळांचे चित्रण करण्याची मोहीम हाती घेतली. बहुतांश कृष्णधवल आणि लाल, निळा किंवा चॉकलेटी रंगाचा अतिशय माफक वापर अशी त्याची चित्रणशैली आहे. त्यामुळे एक वेगळीच वातावरणनिर्मिती चित्रामध्ये होते. आशिफचे प्रदर्शन सध्या खार पश्चिमेस असलेल्या रिदम कलादालनात सुरू असून ३१ जुलैपर्यंत पाहता येईल.
आशिफ होसैन – response.lokprabha@expressindia.com