इंग्रजी भाषेतले वेगवेगळे वाक् प्रचार जोडून एखादा नवाच वाक् प्रचार तयार करत थोडक्यात सांगायचं तर भाषेशी खेळत दिलेले बातम्यांचे मथळे वाचकाचं लक्ष वेधून घेणारे ठरतात.

माझी मावशी पुण्याला आहे. सोसायटीत तिच्या शेजारी एक तरुणी रहाते. जाड चष्मावाली ही बया सकाळी दहाच्या सुमारास पर्स आणि एखादं पुस्तक घेऊन बाहेर पडताना दिसते. मावशीकडून कळालं की ती एका इंग्रजी दैनिकात उपसंपादक म्हणून काम करते. उपसंपादकाचं काम म्हणजे बातम्यांचं संकलन, संपादन आणि आकर्षक मथळे देणे. हे कळताच आमच्या काकांनी तिला नाव ठेवलं- मथळेवाली (चाल-नखरेवाली). आज मथळेवालीची आठवण होण्याचं कारण आजचे सारे शब्द वृत्तपत्रीय मथळ्यांतून घेतलेत.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

१) फॉम्युला वन शर्यतीसंबंधीचा एक लेख. या रेसिंग गाडय़ांच्या शर्यती आता भारतात सुरू होताहेत. एक नवा क्रीडा प्रकार भारतात रुजण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेत. अर्थात हा सगळा पशाचाच खेळ आहे, हे सुचवणारं सुरेख शीर्षक या लेखाला आहे- for-moolah-one.

moolah- money
उदा. He doesn’t care about job satisfaction. He is satisfied with moolah.
[Formula one मध्ये थोडा बदल करत for-moolah-one असं भन्नाट शीर्षक दिलंय.]

२) मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतरचे दिवस. एका संतप्त नागरिकानं वृत्तपत्राला पत्र लिहिलं. मानवी हक्क, अिहसक प्रतिकार, मतपरिवर्तन वगरे बकवास बंद करून, अतिरेकी आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावर जरब बसवणारी, कठोर कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या या पत्राचं शीर्षक होतं take no terrorists ! (याचा अर्थ समजण्यासाठी take no prisoners हा वाक्प्रचार माहिती हवा.)
take no prisoners (टेक नो प्रिझनर्स)
– be very determined and not care about other people’s feelings.
उदा. When Madhu is angry, she takes no prisoners.
[prisoners ऐवजी terrorists असा बदल करून ‘दहशतवाद्यांना दया-माया नको. त्यांचा खातमा करा.’ (take no terrorists) असं सणसणीत शीर्षक दिलंय.]

३) जसा कोकणचा आंबा तसं काश्मीरचं सफरचंद. पण आता काश्मिरात स्ट्रॉबेरीची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जातेय. उत्कृष्ट चवीची स्ट्रॉबेरी काश्मिरात बनू लागलीय. यासंबंधीच्या एका बातमीचं शीर्षक होतं- The new apple of the valley’s eye.

the apple of somebody’s eye – a person or thing of whom you are extremely fond and proud.
उदा. His youngest son was the apple of his eye.
[ काश्मिरात पिकणारं apple  आणि somebody’s eye मधलं apple सांगड घालत The new apple of the valley’s eye हा सुंदर मथळा बनलाय.]

४) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल िक्लटन भारत दौऱ्यावर आले आणि भारत-अमेरिका संबंधातलं एक नवं मत्री पर्व सुरू झालं. या भेटीदरम्यान एका इंग्रजी वृत्तपत्रानं लिहिलेल्या अग्रलेखाचं शीर्षक होतं- Bill and coup.

coup (कृऽ) –  the fact of achieving something that was difficult to do.
उदा. Getting that contract has been quite a coup for us.
(Bill and coup याचा अर्थ Bill  म्हणजे बिल िक्लटन आणि coup म्हणजे भारत-अमेरिका संबंध मत्रीपूर्ण बनवण्याची कामगिरी.)
यात आणखी एक गंमत आहे. Bill and coo असा एक वाक्प्रचार आहे.
bill and coo (बिल अँड कूऽ) –  kiss and speak in a loving way to each other; प्रेमकूजन.
[भारत-अमेरिकेची मत्री अर्थात प्रेमकूजन (bill and coo) सुरू झालं आहे आणि ही बिल (Bill) िक्लटन यांची मोठीच उपलब्धी (coup) आहे. एवढा सगळा अर्थ Bill and coup या शीर्षकात दडलेला आहे.]
एका मराठी वृत्तपत्रातला मथळा. ‘प्रदीर्घ आहाराने निधन’ (बातमीदाराला ‘प्रदीर्घ आजाराने’ असं म्हणायचं होतं.)