धुळ्यात निघालेल्या मराठा मोर्चाला उन्हाचा फटका बसला आहे. मोर्चात सहभागी झालेल्या १५० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती.

धुळ्यात बुधवारी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून या मोर्चाची सुरुवात झाली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेदेखील सहकुटुंब या मोर्चात सहभागी झाले. राज्यातील अन्य मोर्चाप्रमाणेच या मोर्चामध्येही लाखोंचा समुदाय उतरला. कडक उन्हातही मोर्चेकरांचा उत्साह कायम होता. मोर्चादरम्यान १५० जणांना उन्हाचा त्रास झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
धुळ्यातील मोर्चाही शिस्तबद्धपणे पार पडले. महिला आणि तरुणींची उपस्थितीही लक्षणीय होती. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डीतील बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशा विविध मागण्याही या मोर्चात करण्यात आल्या. या मोर्चामध्ये धुळ्यातील सुमारे ४०० वकील सहभागी झाले होते.  या मोर्चामध्ये वयोवृद्ध दाम्पत्याची हजेरी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. १०५ वर्षांची नारायण पाटील आणि त्यांनी ९५ वर्षांची पत्नी सोजाबाई यादेखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हे दोघेही सिंदखेडा तालुक्यातील डोंगरगावचे रहिवासी आहेत.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
students clashed again in pune university premises
पुन्हा विद्यार्थी भिडले! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुन्हा हाणामारी….