आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी व इतर नर्सिंग कोर्सला ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा)परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने निर्णय घेण्याच्या तयारी केली आहे, असे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.
या सर्व वैद्यकीय शाखांना त्यांची स्वतःची सीईटी (सामाईक पात्रता परीक्षा) घेता येणार नाही, असा हा प्रस्ताव आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ परीक्षा अनिवार्य असल्याचे तर इतर वैद्यकीय शाखांसाठी ‘नीट’ अनिवार्य नसल्याचे म्हटले होते.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने नव्या निर्णयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण निर्णयावर सरकार काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे.