सहकाराला दिशा देणा-या वसंतदादांच्या नावाने असणा-या साखर कारखान्याला देणी फेडण्यासाठी जमीन विकावी लागते, याचे वसंतदादांना काय वाटेल असा सवाल अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला.
विटय़ाचा यशवंत कारखाना, जतचा कारखाना कोणी आजारी पाडला, हे कारखाने आम्ही बंद पाडले काय, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखाने असो वा आर. आर. आबांची सूतगिरणी असो उत्तम चालले आहे. वसंतदादा शेतकरी बँकेत महापालिकेच्या ठेवी अडकल्या आहेत. अशा संस्थांची ८८ कलमान्वये चौकशी का रोखली जाते असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
सांगली महापालिकेची सत्ता आता काँग्रेसच्या ताब्यात गेली, मात्र गेल्या वर्षांत कोणतेही विकासाचे काम झाले नाही. विकासाचे राजकारण करीत असताना आम्ही कोणाच्या आडवे येत नाही. या सहकारी संस्था डबघाईला आणण्याचे काम कोणी केले याचे उत्तर सांगलीकरांनी शोधावे असेही पवार यांनी या वेळी सांगितले.