अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेची कोकण प्रांत सभा जेएसएम महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच पार पडली. या बठकीत रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अ‍ॅड. संतोष पवार यांची जिल्हाध्यक्षपदी, अ‍ॅड जयंत चेऊलकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. एस पी खानवकर यांची उपाध्यक्षपदी आणि चंपालाल ओसवाल यांची सह सचिवपदी निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य म्हणून राजेंद्र येरुणकर, अनिकेत ठाकूर, मनोज म्हात्रे, आणि पराग म्हात्रे यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील वकीलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून अभिवक्ता परिषद काम करेल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली. या वेळी कोकण प्रांत अध्यक्ष रामभाऊ आपटे, सचिव आनंद नायक, वीरेंद्रनाथ शुक्ला, दीपक गायकवाड आणि शांताराम दातार यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागातून आलेले वकील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.