जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला सोमवारी अपघात झाला. या अपघातात कुचे यांच्या डोक्याला आणि मानेला मार लागला आहे. नारायण कुचे स्कॉर्पिओ गाडीतून औरंगाबादला  जात असताना टायर फुटल्यामुळे गाडी स्कूलबसला धडकली. जालन्यातील मोतीबागेजवळ सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला.

शाळेला सुट्ट्या असल्यामुळे स्कूलबस चालक खासगी वाहतूक करत होता. अपघातावेळी या बसमध्ये काही प्रवासी होते. त्यामधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालन्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर नारायण कुचे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.