शासकीय रक्तपेढीतील रक्तपिशवीचे दर हजार रुपयांहून ८५० रुपयांचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन करताना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, शासकीय रक्तपेढीतील रक्तपिशवीचे दर साडेचारशेहून एक हजार रुपये करण्यात आले होते. ही दरवाढ काही अंशी मागे घेण्यात येत आहे. हे दर दुप्पटीहून अधिक वाढविण्यात आल्याबद्दल लोकसत्ताने याविरुध्द मोहीम हाती घेतली होती. त्याची दखल घेऊन सरकारने ही दरवाढ अंशत मागे घेतली आहे.mh08