धनगर समाजाचा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी राज्यभर धनगर समाजाचे कार्यकत्रे आक्रमक झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या गाडीचा ताफा लातूर-बार्शी रस्त्यावर कार्यकर्त्यांनी अडवला. पोलिसांनी १५ कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
धनगर समाजाच्या मागण्यांबाबत राज्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी गाडीचा ताफा अडवला. देशमुख यांनी गाडीखाली उतरून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री तुमच्या मागणीबद्दल सकारात्मक विचार करीत आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल. कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असेल तर त्यांनी मुंबईत यावे. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून मागणीबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.