विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत पार पडल्या. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी थेट नेत्यांसमोरच उफाळून आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील नेत्यांसमोर माजी मंत्री सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या समर्थकांची मोठय़ा प्रमाणात हुल्लडबाजी झाली आणि गोंधळातच मुलाखतींचा सोपस्कार उरकण्यात आला.
राष्ट्रवादीतर्फे विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती मुंबईत मंगळवारी पार पडल्या. जिंतूरमधून विजय भांबळे यांचा एकमेव अर्ज पक्षाकडे होता. गंगाखेडमधून डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी खासदार सुरेश जाधव, डॉ. प्रफुल्ल पाटील, सुरेश गिरी यांचे अर्ज होते, तर परभणीतून तब्बल ११जण इच्छूक होते. हे सर्व इच्छूक मुलाखतीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जमले. सायंकाळी परभणी जिल्ह्यातील मुलाखतींना सुरूवात झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड आदी नेतेमंडळी उपस्थित होती.
जिल्हा पातळीवर वरपुडकरांनी अर्ज भरला नव्हता. परंतु पक्ष कार्यालयात त्यांनी मुलाखत दिली, तर राज्यमंत्री फौजिया खान यांनीही कळमनुरी मतदारसंघातून अर्ज भरला. परभणीसह गंगाखेड, जिंतूर मतदारसंघांच्या मुलाखती पार पडल्या. पाथरी मतदारसंघातून इच्छूक राजेश विटेकर, चक्रधर उगले यांनी आपली मते मांडली. विटेकर यांनी आपले वडील उत्तमराव विटेकर यांच्यापासून आपण पवार यांच्याशी एकनिष्ठ आहोत, असे सांगून मतदारसंघात सर्वाशी आपले चांगले संबंध आहेत, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक काम करणाऱ्यांनाच उमेदवारी द्यावी, असेही विटेकर मनोगतात म्हणाले.
या वेळी तेथे उपस्थित वरपुडकर यांनीही मनोगताचे भाषण सुरू केले. आपण सुरुवातीपासूनच पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मतदारसंघ फेररचनेत पाथरी मतदारसंघात आपला जुनाच ७० टक्के मतदारसंघ असतानाही आपल्याला गंगाखेडमधून उमेदवारी देण्यात आली. ती निवडणूक आपण लढलो. मात्र, पराभव झाला. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही आपल्याला डावलले. आता मात्र उमेदवारी मिळाली पाहिजे. आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत, असेही ते म्हणाले. या वेळी लगेच उपस्थित कार्यकर्त्यांमधून एकाने उठून लोकसभेला काय केले ते सांगा, असे म्हणाला. त्यावर वरपुडकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मागील निवडणुकीत वरपुडकर लोकसभेचे उमेदवार असताना भांबळे यांनी काय केले, असा सवाल वरपुडकर समर्थकांनी उपस्थित केला. हा सर्व प्रकार शरद पवारांसमोर घडत होता. या वेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी वाढल्याने अखेर नेत्यांनाच हस्तक्षेप करावा लागला. वरपुडकरांनी आपले भाषण थांबवले.
मंत्री छगन भुजबळ यांनी या वेळी आवेशात येऊन कार्यकर्त्यांना शांत होण्याचे आवाहन केले. नेत्यांसमोर असा गोंधळ बरा नव्हे, अशी समज त्यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना दिली. या गोंधळातच परभणी जिल्ह्याची बठक आटोपली. बठकीतून बाहेर पडल्यानंतर वरपुडकर समर्थकांनी घोषणाबाजी देत राष्ट्रवादी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. प्रत्यक्ष पक्ष नेतृत्वासमोरच झालेल्या हुल्लडबाजीने नेत्यांना परभणीतील राष्ट्रवादीचा लेखाजोखाही आपोआपच मिळाला.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट