सन २०११ ते २०१५ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लोकराज्य ग्राम हा प्रभावी उपक्रम राबवून ७० ग्रामपंचायती लोकराज्ये ग्राम करण्यात आल्या. लोकराज्य ग्राम या उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती साहाय्यक संध्या गरवारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
मुंबई येथील माहिती अधिकारी कार्यशाळेत विभागस्तरावर व जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यात होर्डिग्ज उभारणीमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपसंचालक (प्रकाशने) सीमा रनाळकर, कुंभमेळ्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक विभागाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळीत, नागपूर विभागाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, मंत्रालय मुंबई येथील वरिष्ठ साहाय्यक संचालक(वृत्तचित्र) मीनल जोगळेकर, जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती अनिल गडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती साहाय्यक संध्या गरवारे, उर्दू लोकराज्यचे प्रतिवेदक परवेज मोहमद परवेज यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क सचिव मनीषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक(माहिती व प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती व वृत्त) शिवाजी मानकर, राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, माहिती साहाय्यक, कॅमेरामन या कार्यशाळेला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालक (माहिती व वृत्त) शिवाजी मानकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे गावोगावी पोचविण्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. याच उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाने सन २०११ ते सन २०१५ या कालावधीत लोकराज्य मासिक सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ७० ग्रामपंचायतींच्या कुटुंबांपर्यंत पोचविण्याचा राबविलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची या उपक्रमामुळे प्रतिमा उंचावण्याकरिता केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल म्हणून हा सत्कार कार्यक्रम पार पडला.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा